
Baramati Malegaon Sugar Factory Election Result:
तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मधून भालचंद्र देवकाते उमेदवार होते. 101 मतांपैकी अजित पवारांना 91 मते मिळाली तर देवकाते यांना अवघी 10 मते मिळाली. Malegaon Factory Election: माळेगाव कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल; अजित पवारांचा दणदणीत विजय
Malegaon Sugar Factory Election Result: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीतील पहिला निकाल हाती आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून 91 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या विरोधात तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मधून भालचंद्र देवकाते उमेदवार होते. त्यांना अवघी 10 मते मिळाली आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संस्था प्रतिनिधी ब प्रवर्गातून श्री निळकंठेश्वर पॅनलमधून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवीत आहेत. यामध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या विरोधात तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मधून भालचंद्र देवकाते उमेदवार होते. 101 मतांपैकी अजित पवारांना 91 मते मिळाली तर देवकाते यांना अवघी 10 मते मिळाली.
दरम्यान, अजित पवार यांच्या विजयानंतर निलकंठेश्वर पॅनेलच्या सदस्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. अजित पवार यांचा विजय हा आमच्यासाठी शुभ संकेत असून आमचे सर्व उमेदवार विजयी होतील. सभासदांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे, असं कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांनी म्हटलं आहे.