नवाब मलिकांचा फडणवीसांना खोचक टोला“माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणांचं ‘ओएसडी’ व्हावं तर सोमय्यांना…”; नवाब मलिकांचा फडणवीसांना खोचक टोला महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टोला लगावला आहे.माझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणांना सूचना देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बराच रस घेत आहेत. त्यांनी स्वत:ला तपासयंत्रणांचा ओएसडी म्हणून नियुक्त केले पाहिजे, नाहीतरी त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त्यांचा भरपूर अनुभव आहे. तर किरीट सोमय्या यांनी तपासयंत्रणांचा प्रवक्ता म्हणून स्वत:ची वर्णी लावून घ्यावी, असा टोला नवाब मलिक यांनी ट्विट करुन लगावला आहे.’तसेच ‘उद्या सकाळी माझ्या घरी काही अधिकृत पाहुणे भेट देणार आहेत’, अस सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल रात्री केलं आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले नवाब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.दरम्यान नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या आरोपांचा सपाटा लावला होता. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवल्याचा दावा केला होता. तसेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तपासयंत्रणांच्या सदोष भूमिकेवर नवाब मलिक यांनी बोट ठेवले होते. ही दोन्ही प्रकरणे नवाब मलिक यांनी शेवटपर्यंत लावून धरली होती. या सगळ्यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. त्यामुळे आपल्या घरी लवकरच ईडी किंवा सीबीआयची धाड पडेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या घरावर खरंच तपासयंत्रणांची धाड पडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
मीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेन :प्रमोद सावंत
पणजी – गोवा विधानसभेच्या सन 2022 साली होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मीच भाजपचा, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी...
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सीलबंद भागाचे उत्खनन आणि वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करत चार हिंदू महिलांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात...
पाकिस्तानी महिलेने यूट्यूबवर भारतात प्रवेश करण्याचे मार्ग शोधले, ती ग्रेटर नोएडामध्ये राहताना आढळली
एका पाकिस्तानी महिलेने यूट्यूबवर भारतात प्रवेश करण्याचे मार्ग शोधले (प्रतिनिधित्वात्मक प्रतिमा)मे महिन्यात बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या एका पाकिस्तानी...
सुप्रीम कोर्टाच्या पुशबॅक टू केंद्राला चर्चेसाठी 4 दिवस लागले: सूत्र
नवी दिल्ली: न्यायमूर्तींच्या पदोन्नतीबाबत केंद्राशी झालेला संवाद सार्वजनिक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अभूतपूर्व पाऊल चार दिवसांच्या विचारविनिमयानंतर उचलण्यात...