मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत आहे
याबाबत माहिती माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतः याबाबत माहिती दिली.
त्यांनी म्हंटल आहे की, ‘आज माझी कोव्हीड टेस्ट (COVID test) पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत आहे.’ तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.’ असे आवाहन त्यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने होत असल्याचं पहायला मिळत आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मंगळवार (28 डिसेंबर) समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) आणि त्यांचे पती सदानंद सुळे (sadanand sule) यांना करोनाची (covid19) लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.




