
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. इम्रान यांना लाहोरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आज ‘तोषखाना’ प्रकरणात इस्लामाबाद कोर्टाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने आज निकाल देत इम्रान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अटकेची कारवाई केली.
तसेच इम्रान यांना 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जर दंड भरला नाहीतर इम्रान खान यांनाq अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागणार आहे. इम्रान खान यांच्या अटकेच्या कारवाईनंतर त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे. पुढील 5 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.
काय आहे तोषखाना प्रकरण?
▪️माजी पंत्रप्रधान इम्रान खान यांना तोषखाना प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र तोषखाना प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात… तोषखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे, जेथे इतर सरकारांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकारी अशा परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. मात्र इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी 2018 मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून युरोप आणि विशेषतः अरब देशांच्या भेटी दरम्यान अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या होत्या त्या भेटवस्तू त्यांनी कमी किमतीत खरेदी करून विकल्या. त्यामुळे त्यांना आज जमान पार्क येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.