
शहरात पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराची सुरुवात.
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली व अपक्ष उमेदवारी सत्यजित तांबे यांनी घेतली असुन अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील माजी.नगरसेवक शेख मुद्दसर यांच्या निवासस्थानी भेट घेतली व मीडिया कौन्सिलच्या वतीने सत्यजित तांबे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की तयारी फक्त निवडणुकीपुरती नसून मतदारांसोबत कायम राहणार असुन युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याची भावना व्यक्त केली. तर यावेळी माजी नगरसेवक शेख मुद्दसर यांच्या हस्ते तांबे यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अफजल सय्यद, ईकरा शाळेचे चेअरमन सय्यद इक्बाल, ट्रस्ट काझी सर, सबिल सय्यद, साहिल सय्यद, फारुक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.