अहमदनगर -जागतिक महामारी कोरोनाने नागरिक त्रस्त असतानाच साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणामुळे छोटे-मोठे आजार सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात रुग्ण असल्याचे दिसून येते. सध्याची परिस्थिती पाहता महागडे उपचार घेणे नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक डॉक्टर व सामाजिक संस्था पुढे येऊन समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने सर्वरोग निदान शिबिरांचे आयोजन करीत आहे. अल-कौसर क्लिनिकच्या सहकार्याने व माजी नगरसेवक मुद्दसर शेख यांच्या वतीने मुकुंदनगर भागातील नागरिकांसाठी हे शिबिर आयोजिण्यात आले आहे. या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा चांगला प्रयत्न आहे. समाजामध्ये सामाजिक भावना जागृत असल्याचेच हे द्योतक आहे. सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातून जनतेची आरोग्य सेवा करण्याचा हा उपक्रम स्पृहणीय असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.अल-कौसर क्लिनिकच्या सहकार्याने व माजी नगरसेवक मुद्दसर शेख यांच्या वतीने आयोजित सर्वरोग निदान शिबिरप्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते. याप्रसंगी अक्षय कर्डिले, असलम शेख, हाजी साबीर शेख, अब्दुल कादिर बागवान, अब्दुस सलामभाई, सय्यद अर्शद, मोहम्मद शरीफ अ. गनी, डॉ. अशपाक पटेल, डॉ. एम. के. शेख, डॉ. शेख हसीना मुद्दसर, डॉ. कौसर आफरीन, तनवीर चष्मेवाला, लाला खान, अंकुश चक्कर, गजेंद्र भांडवलकर, फिरोज कुरेशी, हुजेर खान, फारूक शेख, समीर सय्यद, फिरोज शेख आदी उपस्थित होते. दर्गा दायरा रोड, मुकुंदनगर येथे क्लिनिकची तिसरी शाखा सुरू करण्यात आली असून, तेथेच हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा सुमारे 400 ते 500 रुग्णांनी लाभ घेतला.आ. जगताप पुढे म्हणाले की, माजी नगरसेवक मुद्दसर शेख यांनी या परिसरात चांगले काम उभे केले असून, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी ते कायम झटत असतात. त्यांनी शिबिराचे आयोजन केल्यामुळे परिसरातील रुग्णांच्या अडचणी दूर होण्यास मदत झाली, असे ते म्हणाले.अक्षय कर्डिले म्हणाले की, परिस्थितीअभावी अनेकजण इच्छा असूनही उपचार घेत नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष करतात. अशांसाठी अनेक सामाजिक दिवसेंदिवस पुढे येऊन रुग्णांची सेवा ईश्वर सेवा मानून मोफत सेवा देत आहेत. त्यामुळेच आजच्या परिस्थितीत सर्वरोग निदान शिबिरांची गरज आहे. अल-कौसर क्लिनिकची ही तिसरी शाखा असून, ते चांगले काम करीत आहेत. अधिकाधिक रुग्णाभिमुख सेवा द्यावी, असे ते म्हणाले.माजी नगरसेवक मुद्दसर शेख म्हणाले की, अल-कौसर क्लिनिक आयोजित सर्वरोग निदान शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले, तसेच गरजूंना मोफत औषधे देण्यात आली. रक्तातील साखरेची तपासणी करून योग्य असे मार्गदर्शन देण्यात आले. परिस्थितीचा विचार करूनच हे शिबिर आयोजित केले. विविध भागात गरज असेल, तेथे अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले.मा. संपादकदै.अहमदनगर.कृपया प्रसिद्धीसाठी.माजी नगरसेवक मुद्दसर शेख व अल-कौसर क्लिनिकच्या सहकार्याने यांच्या वतीने मुकुंदनगर भागत आयोजित सर्वरोग निदान शिबिरप्रसंगी आ. संग्राम जगताप, अक्षय कर्डिले, असलम शेख, हाजी साबीर शेख, अब्दुल कादिर बागवान, अब्दुस सलामभाई, सय्यद अर्शद, मोहम्मद शरीफ अ. गनी, डॉ. अशपाक पटेल, डॉ. एम. के. शेख, डॉ. शेख हसीना मुद्दसर, डॉ. कौसर आफरीन, तनवीर चष्मेवाला, लाला खान, अंकुश चक्कर, गजेंद्र भांडवलकर, फिरोज कुरेशी, हुजेर खान, फारूक शेख, समीर सय्यद, फिरोज शेख आदी उपस्थित होते. (छाया/बबलू शेख, नगर.)
Home महाराष्ट्र अहमदनगर माजी नगरसेवक मुद्दसर शेख व अल-कौसर क्लिनिक यांच्या वतीने मुकुंदनगर भागत आयोजित...
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
राशीभविष्य – दि. ३० ऑक्टबर रविवार..
आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग कोणता असेल जाणून घ्या.
महुआ मोईत्रा यांनी बेदखल आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली; बाब सूचीबद्ध
नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानीतील सरकारी बंगला रिकामा करण्याच्या इस्टेट संचालनालयाच्या नोटिशीच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा...
दरोड्याची तयारी, घरफोडी चोरी व चोरी अशा एकूण ५ गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद
दरोड्याची तयारी, घरफोडी चोरी व चोरी अशा एकूण ५ गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत...
पन्नास हजारांची लाच स्वीकारताना लिपिकाला पकडले
आणखी कोणाचा संबंध?
शेवगाव तहसिलदार कार्यालयातील गौण खनिज विभागातील एका लिपिकाला पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले...





