माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Money Laundering Case: ईडीनं अनिल देशमुख यांच्याविरोधात 11 मे रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ईडीनं 2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक केली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झालीय. अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी विशेष न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ईडीनं मनी लाँडरिंग प्रकरणाच्या आरोपाखाली त्यांना दोन नोव्हेंबरला अटक केली होती. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टानं त्यांना 7 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कोठडीत पाठवलं होतं. अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी मुंबई विशेष न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान, यावेळी प्रकृतीचं कारण देत अनिल देशमुख यांनी घरच्या जेवणाची मागणी केली. परंतु, न्यायालयानं त्यांची मागणी फेटाळली. न्यायलायानं त्यांना आधी तरूंगाचं जेवण खाण्यास सांगितलंय. ते योग्य नसल्यास विचार करू, असंही न्यायालयानं म्हटलंय. मात्र, न्यायालयानं त्याला तुरुंगात स्वतंत्र बेड ठेवण्याची परवानगी दिलीय. यासाठीही त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं होतं. अनिल देशमुख हे वारंवार त्यांची अटक टाळत होते. ईडीकडून त्यांना पाच वेळा समन्स पाठवलं होतं. त्यांना प्रथम 26 जून रोजी समन्य पाठवण्यात आलं होतं. परंतु, ते नोव्हेंबरमध्ये ईडी कार्यलयात हजर झाले. अनिल देशमुख यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलालाही ईडीनं दोनदा समन्स बजावण्यात आलंय. परंतु, ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. अनिल देशमुख यांनी कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंटमालकांकडून 100 कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य देण्यात आलं होतं, असा आरोप मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. त्यानंतर सीबीआयनं प्राथमिक चौकशीअंती एफआयआर नोंदवला. त्याआधारे ईडीनं अनिल देशमुख यांच्याविरोधात 11 मे रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ईडीनं 2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here