माजी खा.स्व.दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनलचे पहिल्याच दिवशी सहा अर्ज दाखल

माजी खा.स्व.दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनलचे पहिल्याच दिवशी सहा अर्ज दाखल अहमदनगर : नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी माजी खा. स्व. दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनलच्या अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शहर मतदार संघाच्या सर्वसाधारण गटातून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये बँकेचे माजी संचालक अनिल कोठारी, राजेंद्र अग्रवाल यांच्यासह ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, संपत बोरा तसेच माजी संचालक दीपक गांधी यांच्या पत्नी संगीता गांधी यांचा समावेश आहे. संगीता गांधी यांनी महिला राखीव मतदार संघातून अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकारी उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे हे अर्ज दाखल केले. अर्बन बँकेचे माजी चेअरमन स्व. दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनलही निवडणूक श्रीमती सरोज गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवत असल्याची माहिती सुवेंद्र गांधी यांनी दिली.उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी नगरसेवक राहुल कांबळे, मनोज कोतकर, माजी संचालक दीपक गांधी, शैलेश मुनोत, आदेश कोठारी, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, अमित मुथा, वसंत बोरा, अजय चितळे, रोषन गांधी, मल्हारी दराडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here