माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानमध्ये अपघात

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानमध्ये अपघात
जयपूर : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानातील सवाई माधोपूर येथे अपघात झाला. मोहम्मद अझरुद्दीन यांचे वाहन पलटी झाले. या अपघातात अझरुद्दीन थोडक्यात वाचले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ हा अपघात झाला आहे.
अझरुद्दीन कुटुंबासह रणथंभोर येथे जात होते. अझरुद्दीन यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. अझरुद्दीनला दुसर्‍या वाहनाने हॉटेलमध्ये नेले.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष आहेत. अजहर यांनी भारताकडून 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी 45.03 च्या सरासरीने 6215 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने 36.92 च्या सरासरीने 9378 धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here