माजलगावात दुचाकींच्या भीषण अपघातात दोन जण ठार

571

माजलगावात दुचाकींच्या भीषण अपघातात दोन जण ठार

दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोघांनाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले

माजलगाव : पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने समोरील दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले.ही घटना शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपासमोर घडली. या अपघातात जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अभियंता अरुण जगन्नाथ शेजूळ (वय ६५ वर्ष, रा. आबेगाव), यांच्यासह नंदकुमार संतराम महिपाल (वय ३८, रा. शिंदेवाडी) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरुण शेजूळ हे माजलगावहून खामगाव पंढरपूर महामार्गावरून स्कूटीवरून शेतात जात होते. रिलायन्स पंपाच्या बाजूला असलेल्या शेतात जाताना त्यांनी अचानक स्कूटी वळविली असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या नंदकुमार महिपाल यांच्या युनिकॉर्न दुचाकीची धडक बसली. पाठीमागून येणारी दुचाकी वेगात असल्याने मोठा अपघात होऊन दुचाकीवरील दोघेही सिमेंट रस्ता असलेल्या महामार्गावर पडले. यामुळे दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोघांनाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

बीड- नवनाथ आडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here