मागास वर्गीय समाजातील पात्र लाभार्थींनी
कार्यान्वित योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि. 10 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळा मार्फत मागास वर्गीय समाजातील पात्र लाभार्थींना सन 2021-2022 या वर्षासाठी 20 टक्के बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वित केल्या आहेत.
इच्छुक लाभार्थींनी नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळ (मर्यादित) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा माळा, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पुलाजवळ, सातारा (दु. 02162-295184) येथे संपर्क साधावा.
00000





