महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…

442

चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळत आहे. धोनी क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या पाश्वभूमीवर अखेरचा सामना कधी आणि कुठे असावा याबद्दल खुद्द माहीने सांगितलं आहे. चेन्नईमध्ये बोलत असताना अखेरचा सामना चेन्नई शहरातच खेळण्याची इच्छा आहे, असं धोनीने म्हटलंय. तसेच क्रिकेटला अलविदा कधी करणार याबाबतदेखील त्याने अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय.

“मी क्रिकेटचे सर्व सामने नियोजन लावूनच खेळले. मी माझा शेवटचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना रांची येथे खेळला. तर माझा अखेरचा टी-20 साना चेन्नई येथे व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा अखेरचा सामना पुढच्या वर्षी असेल किंवा पुढच्या पाच वर्षात कधीही असेल, या संदर्भात मला माहिती. पण तो चेन्नई येथेच खेळला जाईल अशी मला आशा आहे,” असे धोनी म्हणाला.

याआधी धोनीने चेन्नईमध्येच आपल्या निवृ्त्तीबद्दल सविस्तर सांगितले. आता नोव्हेंबर महिना आहे आणि आयपीएल 2022 एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे मी विचार करेल. सध्या घाई नाही, असे धोनीने माध्यमांना सांगितलं. क्रिकेटमधून सन्यास नेमका कधी घेणार हे थेट सांगणे धोनीने टाळले आहे.

आंततराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेला असला तरी धोनी आयपील t-20 सामन्यांत खेळतो. चेन्नई सुपर किंग्स या संघाचा तो कर्णधार आहे. आयपीएल 2021 ची ट्रॉफी चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात जिंकली. या घवघवीत यशानंतर धोनी आयपीएल 2022 सिझन खेळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये बरेच बदल होणार आहेत. या सिझनमध्ये प्रथमच 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. आयपीएल 2022 पासून अहमदाबाद आणि लखनौ असे दोन नवे संघ खेळताना दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here