महिलेने साडेतीन वर्षाच्या मुलासह संपवले जीवन

महिलेने साडेतीन वर्षाच्या मुलासह संपवले जीवन महिलेने साडेतीन वर्षाच्या मुलासह संपवले जीवनमुंबई : कौटुंबिक वादाला कंटाळून एक महिलेने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासह १५व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृत महिलेचे नाव श्रुती यशराज महाडिक (३६) असून, तिच्या मुलाचे नाव राजवीर महाडिक होते.चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात अल्टा विस्टा या इमारतीमध्ये महिलेचा आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. कुर्ला कामगार नगरमध्ये राहणारी ही महिला घरगुती भांडणामुळे सुसाईड नोट लिहून १२ जानेवारी रोजी आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली होती.ती घरी परतली नसल्याने ती सुसाईड नोट घेऊन तिच्या पतीने नेहरू नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून नेहरू नगर पोलीस या महिलेचा शोध घेत होते.नेहरू नगर पोलीस याबाबत तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना ही महिला मुलाला घेऊन तिच्या आईवडिलांचे घर असलेल्या अल्टा विस्टा इमारतीमधील बंद असलेल्या घरी आल्याचे समजले. पोलिसांनी दोन दिवस तिचा या ठिकाणी शोध घेतला.ही महिला तिच्या मुलासह इमारतीमध्ये दाखल होत होती. मात्र, बाहेर पडताना दिसत नव्हती. अखेर पोलिसांनी या इमारतीचा संपूर्ण परिसर शोधून काढला. इमारतीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज वारंवार पाहिले. अखेर एका सीसीटीव्हीमध्ये एक झाडाची फांदी झटक्याने तुटताना पोलिसांना दिसली आणि पोलिसांना त्या ठिकाणाचा संशय आला.डोंगराची कपार आणि संरक्षक भिंत यांच्यामधून वाहत जाणार्‍या नाल्यात पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर दोन तासांनी पोलिसांना या मायलेकराचे मृतदेह हाती लागले. त्यांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.ही इमारत चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास आता चुनाभट्टी पोलीस करत आहेत. मात्र, क्षुल्लक भांडणामुळे या महिलेने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here