महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर शनिवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

718

महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

शनिवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव, (जिमाका) दि. 6- राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर या शनिवार, दिनांक 7 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

शनिवार, दि. 7 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 6.25 वा. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन व राखीव.

सकाळी 8.00 वा. शासकीय विश्रामगृह येथून अकलूज, पाडळसे, बामणोद येथे कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी, फैजपूर येथून महात्मा गांधी मार्गाने खिरोदाकडे प्रयाण, खिरोदा येथे कर्मयोगी धनाजी नाना चौधरी स्मृती मंदिर, खिरोदा येथे अभिवादन. खिरोदा येथून रोझोदा/कोचूर/सावदा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी व फैजपूरकडे प्रयाण, सकाळी 10 वा. फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव येथे आगमन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीव्दारे आयोजित ‘व्यर्थ न हो बलीदान’ कार्यक्रमास फैजपूर, जि. जळगाव येथे उपस्थिती व रविंद्रनाथ टागोर यांचे पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण, स्थळ :- धनाजीनाना महाविद्यालय, फैजपूर. दुपारी 12.00 ते 1.00 वा. फैजपूर येथे राखीव, दुपारी 1.00 वा. फैजपूर, जि. जळगाव येथून यावल-किनगाव-चोपडा-शिरपूर मार्गे शासकीय वाहनाने चिमठाणा, ता. दोंडाईचा, जि. धुळे कडे प्रयाण.

                                              ०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here