महिला वकिलाकडून सुपारी प्रकरणात ‘ बचपन का प्यार ‘ अँगल
महाराष्ट्रात अवघ्या चार दिवसांपूर्वी गोंदिया शहरात एका खोट्या कुरियर बॉयने महिलेवर हल्ला करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तपास सुरू असताना या प्रकरणातील एक एक पदर उलगडत असून एका वकील महिलेला देखील हल्ला करणाऱ्या व्यक्तीसोबत बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
सदर प्रकरणात वकील महिला आणि आणि जिच्यावर हल्ला झाला तिचा पती यांच्यात बचपन का प्यार असल्याची माहिती समोर आलेली आहे.वकील महिला आणि जिच्यावर हल्ला झाला तिचा पती यांच्यात ‘ बचपन का प्यार ‘ होते मात्र त्यांचे लग्न होऊ शकले नाही आणि तिच्या प्रियकराने दुसरीकडे लग्न केले त्यानंतर त्याला दोन मुली देखील झाल्या मात्र तरीदेखील वकील महिलेच्या डोक्यातून त्याचे प्रेम जात नव्हते.
त्यानंतर तिने सदर प्रकरणी एक मास्टरप्लॅन बनवून यासाठी एक कुरीयर बॉय तयार केला आणि त्याला सोबत घेऊन आपल्या प्रियकराच्या पत्नीवर हल्ला करण्याचा घाट रचला मात्र सदर प्लॅन फेल झाला आणि तिला जेलची हवा खावी लागली.
महिलेने ५० वर्षीय व्यक्तीला सुपारी दिली मात्र तो हा प्रकार करायला तयार नव्हता. त्याला चार लाख रुपयांचे आमिष दिल्यानंतर तो तयार झाला. जिचा खून करायचा आहे ती व्यक्ती निश्चित माहीत असावी म्हणून या महिलेने सुपारी घेणाऱ्याबरोबर तिचे घर देखील गाठले आणि तिचा भाडोत्री सुपारी बॉय सुरज केशव रावते ( वय 50 ) याला सोबत घेऊन तिथे गेली. काही अंतरावर थांबून तिने सदर महिलेची ओळख पटवली आणि त्याला हल्ला करण्यास सांगितले.
सोनम ( काल्पनिक नाव ) हिचा खून करण्यासाठी आलेला सुरज याने चाकूने हल्ला करू लागताच सोनम हिची तेरा वर्षाची मुलगी आरडाओरडा करायला लागली.
माझ्या आईला मारू नका, असे सांगत आरोपीच्या मनात देखील आपल्याला तीन मुली आहेत ही भावना जागृत झाली आणि त्याने तिला मारण्याचा प्लॅन सोडून देत तेथून पळ काढला.
त्यानंतर सदर महिलादेखील तिथून पळून गेली आणि झालेल्या घटनेनंतर काही वेळातच दोघांनाही पोलिसांनी अटक केली.