महिला पोलिसाने पूर्ववैमनस्यातून सुपारी देऊन अपघात घडविला:तिघांना अटक:

महिला पोलिसाने पूर्ववैमनस्यातून सुपारी देऊन अपघात घडविला:तिघांना अटक:

अहमदनगर,दि.१० सप्टेंबर, – मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी सानप याला १५ ऑगस्टला पनवेल रेल्वे स्टेशनबाहेर कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हा अपघात नसून खून असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला पोलिसाने पूर्ववैमनस्यातून सुपारी देऊन हा अपघात घडविल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी एकूण तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मुंबईतील पोलीस शिपाई शीतल पानसरेसह उलवेत राहणारे विशाल जाधव व गणेश चव्हाण यांचा समावेश आहे.याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई पोलिस दलात पोलिस नाईक असलेल्या शिवाजी सानप व महिला पोलीस शिपाई शितल पानसरे दोघांनी मुंबई नेहरू नगर पोलिस ठाण्यात एकत्र नोकरी केली आहे. दोघांची दृढ मैत्री होती. मात्र, याच मैत्रीने सानपचा घात केला. २०१९ मध्ये महिला पोलिस शिपाई पानसरे हिने CBD आणि विष्णू नगर पोलिस ठाण्यात सानप विरोधात बलात्कार, विनयभंग आणि इतर कलमान्वये तक्रार देऊन गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दोघात वाद झाला. यावरुन सानपचा बदला घेण्यासाठी ३ वर्षांपासून कट रचला. १५ ऑगस्ट रोजी सानपचा अपघातात मृत्यू झाला. पण, हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here