महिला अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्राचा ‘शक्ती’शाली कायदा!

महिलांवर अत्याचाराविरोधात कायदे आणखी कडक असावेत असे प्रत्येकालाच वाटते. महाराष्ट्राने आता हेच पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ‘शक्ती कायदा’ असणार आहे.

काय आहेत मुख्य तरतुदी?

बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा अत्यंत दुर्मिळतील दुर्मिळ प्रकरणात फाशी शिक्षा तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड

ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद

अतिशय क्रूर महिला अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद

वय वर्ष 16 पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप

सामूहिक बलात्कार – 20 वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड

16 वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप दहा लाख रुपये दंड

बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड

पुन्हा पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा

सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील

बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड

ऍसिड अटॅक केल्यास किमान दहा वर्षांची किंवा मरे पर्यंत जन्मठेप शिक्षा, पीडित व्यक्तीला दंड रक्कम द्यावी लागणार

ऍसिड हल्ला हा गुन्हा अजामीनपात्र; ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवास

महिलेचा कोणत्या पद्धतीचे छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड

सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here