महिलांना मिळणार 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट, मोदी सरकारची विशेष योजना जाहीर..!

594

माेदी सरकारने विविध समाज घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. आता मोदी सरकारने गाव-खेड्यात राहणाऱ्या महिलांसाठी खास सेवा सुरु केली आहे.. त्याचे नाव आहे, ‘ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी’…!स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत ही सेवा सुरु केली. त्याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ५,००० रुपयांचा ‘ओव्हर ड्राफ्ट’ देण्यात येणार आहे. महिलांसाठी हे एक प्रकारचे कर्जच असेल. मात्र, या सुविधेमुळे महिलांना बॅंक खात्यातून शिल्लक रकमेपेपेक्षा जादा पैसे काढता येणार आहेत. त्यानंतर एका निश्चित कालावधीत ही रक्कम परत करावी लागणार आहे. शिवाय त्यावर व्याजही आकारले जाणार आहे.कोणतीही बॅंक किंवा बिगर बॅंकिग वित्तीय कंपनी (NBFC) ‘ओव्हर ड्राफ्ट’ची सुविधा देऊ शकते. अर्थात, वेगवेगळ्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’साठी ही मर्यादा वेगवेगळी असू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९-२० मध्ये अर्थसंकल्पीय भाषणात याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील महिला समूहांतील सदस्यांकरिता ही सेवा सुरु करण्यात आली आहे.. महिला स्वयंसहायता गटातील सदस्यांना ही सुविधा मिळणार आहे.‘ओव्हर ड्राफ्ट’ सुविधा सुरू करण्याबाबत भारतीय बॅंक संघाने सर्व बॅंकाना सूचना केल्या आहेत. सोबतच या योजनेबाबत इतर माहितीदेखील देण्यात आली आहे. बॅंकांची दारे महिलांसाठी खुलीदरम्यान, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनची सुरूवात जून-२०११ मध्ये करण्यात आली होती. ग्रामीण विकास मंत्रालयाची ही एक प्रमुख योजना आहे. निर्धन महिला स्वयंसहायता समूहांना आर्थिक मदत, तसेच बॅंकांची दारे महिलांसाठी खुली करण्याचा योजनेचा उद्देश आहे.योजनेच्या माध्यमातून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत २७.३८ लाख महिला गटांना ६२,८४८ कोटी रुपयांचे कर्जे बॅंकांनी दिले आहेत. एप्रिल २०१३ नंतर ४.४५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जे वितरित केली आहेत. या कर्जावरील देखरेख करण्यासाठी समितीही नेमली असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here