महिना अखरेपर्यंत बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार

महिना अखरेपर्यंत बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार 28 मुन्नाभाईंपैकी अवघ्या एकावर कारवाईजिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसतानाही आरोग्य सेवा देणारे बोगस डॉक्टर आता जिल्हा परिषदेच्या रडावर आहेत. जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या हाती आली असून यातील संगमनेरच्या एका मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर महिना अखेरपर्यंत सर्व मुन्नाभाईंचां शोेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. दर्शना धोंडे, मनपा आरोग्य अधिकारी राजुरकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सुनील पोटे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब सांळुके आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली असून यात नगर, संगमनेर आणि शेवगाव प्रत्येकी 1, अकोले 4, पारनेर आणि श्रीगोंदा प्रत्येकी 8, पाथर्डी 5 यांचा समावेश आहे. त्यापैकी एकावर करवाई करण्यात आलेली आहे. महिनाअखेर पर्यंत जिल्ह्यातील सर्व बोगस डॉक्टरांना शोधून त्यांच्या कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घेतला आहे. यासह जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची देखील तपासणी करण्याचे निर्देश यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. तसेच श्रीरामपूरमधील लॅब संदर्भात प्राप्त तक्रारी नुसार येत्या दोन आठवड्यांत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here