महा 24News हेडलाईन्स, 5 सप्टेंबर 2021

?पुण्यातील कार्यक्रमात दारूड्याची एन्ट्री; अजितदादा म्हणाले, “काय रे आज दुपारीच चंद्रावर? काय चाललंय काय?” कार्यक्रमात पिकला एकच हशा..?उद्धव ठाकरे हे चांगले डॉक्टर आहेत, म्हणूनच भाजपचं ऑपरेशन करून सेना सत्तेत आली..’ शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा चंद्रकांत पाटलांना टोला.?डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अखेर 8 वर्षांनी आरोपनिश्चिती होणार, 5 आरोपींविरोधात येत्या 7 सप्टेंबरला आरोपनिश्चिती.. यूएपीए कायद्याअंतर्गत खटला चालवण्याची सीबीआयची मागणी..?देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमधील रिक्‍त पदे येत्या ऑक्‍टोबरपर्यंत भरा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आदेश दिला आहे. या सर्व विद्यापीठांत सुमारे सहा हजार पदे रिक्‍त.?माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ अर्बन बॅंक घोटाळ्याप्रकरणी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बॅंकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना अटक केली.?विघटनवादी नेते सय्यद अलि शाह गिलानी यांच्या निधनानंतर काश्‍मीर खोऱ्यातील निर्बंध पुन्हा कडक. इंटरनेट सेवा दोन दिवस खंडित. जमावावरील निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी.?ममतांच्या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा. पश्‍चिम बंगालमधील भवानीपूर आणि अन्य दोन विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकांसाठी 30 सप्टेंबरला मतदान. 3 ऑक्‍टोबरला निकाल.?टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय संस्थेला राज्य सरकारतर्फे 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.?मुझफ्फरनगरमध्ये रविवारी होणाऱ्या महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून शेतकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना फोडून काढू.. शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here