महा 24 News हेडलाईन्स, 4 सप्टेंबर 2021

759

? सणाचा उत्साह असू द्या पण गर्दी मात्र टाळा, गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

? महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी सुमारे 3 लाख 82 हजार परीक्षार्थी, 1 हजार 164 केंद्रांवर आज परीक्षा होणार

? मुकेश अंबानी यांनी केली मोठी घोषणा, पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी करणार 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

? महाराष्ट्रात 50,466 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,86,345 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,37,643 रुग्णांचा मृत्यू

?टोकियो पॅरालिम्पिक: भारताला मिळाले तिसरे पदक; तिरंदाजीत हरविंदर सिंगने पटकावले कांस्यपदक; भारताने आतापर्यंत जिंकली 13 पदके

? Ind vs Eng 4th Test: इंग्लंडच्या सर्वबाद 290 धावांपर्यंत मजल, तर भारताच्या दुसऱ्या डावात बिनबाद 43 धावा

?ओबीसी आरक्षण: इम्पेरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती; तोपर्यंत निवडणूक आयोगाशी चर्चा करून निवडणुका पुढे ढकलाव्यात – बैठकीत निर्णय

?भारतात 3,99,498 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,20,92,117 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,40,256 रुग्णांचा मृत्यू

?केरळमध्ये 11 वीची परीक्षा घेण्यावर बंदी; सर्वोच्च न्यायालयाने कोरोना मृत्यू प्रमाणपत्र आणि भरपाईवरुन केंद्र सरकारला फटकारले

? जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय मंत्री दौरा करणार; 70 केंद्रीय मंत्री 10 सप्टेंबरपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती

?वर्धा – एटीएम मशीनमधून 4 लाख 54 हजाराची रोकड पळविणारे चोरटे जेरबंद; उत्तर प्रदेशाच्या मोहबा येथून अटक

? बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण 50.41 टक्के मतदान; एकूण 2,17,160 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

? पुण्यातील भोसरीच्या जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंविरोधात ED चे 1,000 पानी आरोपपत्र दाखल; पत्नी आणि जावयासह आणखी दोघांचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here