? औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण 18 कोरोनाबधित रुग्णांची नव्याने नोंद, 21 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यु तर 220 रुग्णांवर उपचार सुरू.
? संभाजीनगर नावाची नावाची लवकरच कागदोपत्री प्रक्रिया होईल – पालकमंत्री सुभाष देसाई.
? फुलंब्री तालुक्यात ‘समृद्ध गाव’ स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक गावाला आसाम आणि मध्यप्रदेशातून आणलेल्या रोपांचे वाटप.
? पुंडलिकनगर भागात भाजप पदाधिकारी जबाबदार हातावर लिहीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न.
?औरंगाबाद शहरात घरातून हाकलून देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला अटक.
?कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील पूर्णा नदी पात्रात पुलाच्या कामासाठी तरुणांचे जल आंदोलन; ग्रामस्थांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे.
? बिडकीन येथे टॅकर आणि दुचाकीचा अपघातात; अपघातात दुचाकीस्वार ठार.
? डीजे चालकांनी पोळा गणेशोत्सवामध्ये डीजे वाजवू नये,खुलताबाद येथे डीजे चालकांसोबच्या बैठकीत पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांचा निर्णय.
? संभाजीनगर नावासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही -पालकमंत्री सुभाष देसाई.
? अजिंठा लेणी डोंगराला लावणार जाळीचे आच्छादन- पुरातत्व विभागाचे मिलिंद कुमार चावले यांची माहिती
? विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भिलदरी, नागद नुकसानग्रस्त भागात केली पाहणी.
? संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माणुसकी समूहाच्या वतीने घाटी रुग्णालयात रक्तदान शिबिर.
? विवाहित महिलेचा छळ करणाऱ्या ५ जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चिंचखेडा परिसरातील घटना.
?घाटी रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यावर जन्मदाती पसार, आईविरुद्ध बेगमपुरा पोलिसांत गुन्हा दाखल.