महा हेडलाईन्स, 10 ऑगस्ट 2021

736

✒️ संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे, काही ठिकाणी सावधानता बाळगून निर्बंधात शिथिलता आणणे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबत चर्चा

✒️ मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी, मिरवणुका काढण्यास परवानगी नाही; मोहरम साध्या पध्दतीने करण्याचे गृह विभागाकडून आवाहन

✒️ पाम तेलाच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या तेलाच्या संपूर्ण व्यवस्थेत 11000 कोटी रुपये गुंतवले जाणार; राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प

✒️ मराठा आरक्षण: 20 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण प्रश्नी नांदेड येथे मूक मोर्चा तर 19 तारखेला औरंगाबादेत मराठा समन्वयकांची बैठक; संभाजीराजेंची घोषणा

✒️ महाराष्ट्रात 68,375 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 61,51,956 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,34,064 रुग्णांचा मृत्यू

✒️ चंद्रपूर शहरामध्ये गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास 10 हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि 2 वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणार

✒️ गडकरींचे आश्वासन: कोकणातील रस्त्यांसाठी केंद्र सरकार देणार 100 कोटी, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी घेतली केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरींची भेट

✒️ हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ, येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागणार: संयुक्त राष्ट्रांचा जागतिक अहवाल

✒️ भारतात 3,82,292 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,11,73,383 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,28,715 रुग्णांचा मृत्यू

✒️ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका, सर्व रखडलेले प्रकल्प ताब्यात घेणार; गृहनिर्माण खात्याचा मोठा निर्णय

✒️ सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्यासह 15 जणांविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया लवकरच; एनआयएची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात माहिती

✒️ एंटरटेनमेंट: इंडियन आयडल 12 ग्रँड फिनाले: आता ग्रँड फिनालेची स्पर्धा 5 स्पर्धकांमध्ये नाही तर 6 स्पर्धकांमध्ये रंगणार; 12 तास चालणाऱ्या सोहळ्यामध्ये 200 हून अधिक गाणी गायली जाणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here