▪️राज्य मंडळाचा बारावीचा निकाल लागला; मात्र पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्टता नाही.
▪️राज्यात काल 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त; सहा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही.
▪️कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील सरकार पाडण्यासाठी पेगॅससचा वापर; नाना पटोलेंचा दावा.
▪️EVM च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना 10 हजारांचा दंडही ठोठावला.
▪️आयएएस आंचल गोयल यांच्या पुनर्नियुक्तीचे परभणीकरांकडून स्वागत; जिल्हाभरात केलेल्या संघर्षाला यश.
▪️भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर; आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत.
▪️ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश; नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक.
▪️आजपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेला प्रारंभ; टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖