महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 लोकांना विषबाधा, रूग्णांवरती उपचार सुरू; प्रकृती स्थिर

733

नंदुरबार – तालुक्यातील राकसवाडे (rakadwade) गावात महाशिवरात्रीच्या (mahashivratri) प्रसादातून 125 लोकांना विषबाधा झाली तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विषबाधेमुळे अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून 40 जणांवर राकसवाडे आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाचे अधिका-यांनी दिली आहे. गावात विषबाधा झाल्याने डॉक्टर (Doctor) आणि अधिकारी आणि कर्मचा-यांनी राकसवाडे येथेच तळ ठोकला आहे. विषवाधा कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येणार आहे. कारण गावातल्या अनेकांना विषबाधा झाल्याने हा प्रकार कुणी जाणूनबुजून केलाय किंवा यात कशामुळे झालाय याची चौकशी करण्यात येणार आहे.

महाशिवरात्रि निमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन गावात एका ठिकाणी करण्यात आलं होतं. मात्र महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उलट्या होवू लागल्या. हळूहळू उलट्या होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलट्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रसादातून विषबाधा झाल्याचा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र आता सर्वजण सुखरूप असल्याचे देखील आरोग्य विभागाकडून कळविण्यात आलेले आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना एकसारखा त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ तशा पद्धतीचे उपचार करण्यास सुरूवात केली. गावातल्या अनेकांना विषबाधा झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच हे कशामुळं घडलं याची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे गावक-यांनी सांगितले. सुरूवातीला उलट्या कशामुळे होतात, यामुळे गावातलं वातावरण गरम झालं होतं. परंतु डॉक्टरांनी ग्रामस्तांना आधार दिल्याने प्रकरण पुन्हा शांत झाल्याचं पाहायला मिळालं.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दोन वर्षांनंतर महाशिवरात्री साजरी करण्यास अनेक मंदीर उघडी ठेवल्याने भक्तांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळतं होता. परंतु नंदुरबारमधील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 लोकांना विषबाधा झाल्याने अनेकांनी परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. तसेच या प्रकाराची अनेकांनी चौकशी करावी अशी मागणी केली. हे प्रकरण थोडक्यात बजावल असल्याचं अनेकांनाी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here