महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटर फायदेशीर परंतु यामुळे तब्बल 12 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ

    181

    आता  वीज कंपन्या देखील स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार आहेत. हे काम अदानींसह चार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. या मीटरमुळे मीटर रिडींग आणि देयक वाटपाची कामे बंद होणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात सुमारे 12 हजार कंत्राटी कामगारांसमोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.  मे. अदानी, मे. एनसीसी, मे मॉन्टेकार्लो, मे. जिनस या चार कंपन्यांकडे महावितरणने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे कंत्राट दिले आहे. करारातील अटीनुसार स्मार्ट मीटर लावल्यापासून जवळपास 10 वर्षे संबंधित कंपनीलाच मीटरचा डेटा घेणे, यंत्रणा विकसित करणे, मनुष्यबळ लावणे, मीटरमध्ये दोष उद्भवल्यास ते बदलून देण्याची जबाबदारी देखील या कंत्राट दिलेल्या चार कंपन्यांना पार पाडायची आहे. पहिले ही सर्व कामे कंत्राटदाराच्या मार्फत होत असल्याने या माध्यमातून सुमारे 12 हजार कामगारांना यातून रोजगार मिळत होता. मात्र आता स्मार्ट मीटर आल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. एकीकडे देशाचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही बेरोजगारांच्या रोजगारावर भर देत आहेत असे ठणकावून  सांगत असतात, तर दुसरीकडे आमच्यावर घरी बसण्याची वेळही सरकारच आणत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here