महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध प्रकल्प आणि योजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन संकेतस्थळासह सिंहगड व अक्कलकोट येथील पर्यटक निवास आणि गणपतीपुळे बोट क्लबचे उद्घाटन झाले.

तसेच मे. स्काय हाय, मेक माय ट्रिप आणि महाराष्ट्र राज्य इन्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आले.