कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाकडे राज्याची गतिमान वाटचाल
राज्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. लसीकरण मोहीमेला गतिमान करत कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाकडे राज्याची वाटचाल सुरू आहेत. यादृष्टीने व्यापक मोहीम राबवली जात असून राज्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा ५ कोटींचा आकडा पार केला आहे. एका दिवसात लाखोंच्या संख्येने लसीकरण करताना १४ ऑगस्ट रोजी राज्यात तब्बल ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची लसीकरणाची सर्वाधिक संख्या नोंदविली आहे.
लसींचा पुरवठा कमी झाल्याने त्यांची कमतरता भासत असली तरी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी लसीकरणाचा वेग मंदावू दिलेला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश पाठोपाठ आता महाराष्ट्रानेही लसीकरणात पाच कोटींचा आकडा पार केला आहे.
CMOMaharashtra Rajesh Tope #Maharashtra #Vaccination