महाराष्ट्रात लॉकडाऊन निर्बंधांचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवला!*
महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं.
▪️समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर जाऊ नये असं म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे.
सर्कुलरमध्ये विशेषत: दहा वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी आणि जुहू इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात.





