महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची!

महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची!

दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. ? मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भातील नियमावली जाहीर केली असून या राज्यांतून महाराष्ट्रात विमान, रेल्वे अथवा रस्तेमार्गे येणाऱ्यांना कोरोना नसल्याचा अहवाल (आरटी-पीसीआर) दाखविल्याशिवाय राज्यात प्रवेश दिला जाणार नाही. ? *रेल्वे प्रवास-* ▪️ चार राज्यांमधून येणाऱ्या किंवा या राज्यांमध्ये थांबा असलेल्या गाडय़ांमधील प्रवाशांना कोरोना चाचणीचा अहवाल बाळगणे आवश्यक. ▪️ महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 96 तास आधी कोरोना चाचणी आवश्यक. राज्यातील रेल्वे स्थानकांवर उतरल्यावर प्रवाशांची तपासणी. ▪️ लक्षणे आढळल्यास प्रवाशाची प्रतिजन चाचणी, कोरोना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्याची परवानगी. ✈️ *विमान प्रवास-* ▪️दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या चार राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल. ▪️ प्रवासापूर्वी 72 तास आधी चाचणी करणे आवश्यक. कोरोना अहवाल नसणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी (आरटी-पीसीआर). ▪️ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार उपचार. ?️ *रस्तेमार्गे प्रवास-* ▪️ प्रवाशांची सीमेवरच तापमान तपासणी. ▪️ कोणताही लक्षणे नसलेल्यांना राज्यात प्रवेश. ▪️ लक्षणे आढळणाऱ्यांना परत त्या राज्यात पाठवणार. ▪️ लक्षणे असणाऱ्यांची प्रतिजन चाचणीचीही सुविधा. कोरोना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच राज्यात प्रवेश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here