पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये शनिवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला.