महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक नवा महामार्ग ! समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार नवा Expressway, कसा असणार रूट ? पहा….

    112

    Maharashtra New Expressway : महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका निभावण्याची क्षमता ठेवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आलय. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग. आतापर्यंत मुंबई ते नागपूर यांना जोडणाऱ्या या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

    नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा सध्या वाहतुकीसाठी सुरू असून या महामार्गाचा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा टप्पा देखील पुढील महिन्यात सुरू होणार आहे. दोन मे 2025 रोजी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

    Maharashtra New Expressway :-

    स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला वाढवण बंदरासोबत कनेक्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यासाठी राज्यात आणखी एका नव्या एक्सप्रेस वे ची निर्मिती केली जाणार आहे.

    अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढवण बंदर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सोबत जोडण्यासाठी कोणत्या नव्या एक्सप्रेस वे ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा रूट नेमका कसा असेल आणि त्याचा काय फायदा होणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

    कसा असणार नवा एक्सप्रेस वे ?

    मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसी वाढवण बंदरला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबतचा निर्णय नुकताच घेतला असून त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान 118 किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत जवळपास 86 किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे आहे.

    या नव्याने प्रस्तावित महामार्गाची लांबी 86.38 किलोमीटर इतकी राहणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या नव्याने प्रस्तावित महामार्गामुळे वाढवण-इतगपुरी प्रवास फक्त आणि फक्त एका तासात करता येणार असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जात आहे.

    दरम्यान, या प्रकल्पाच्यादृष्टीने एमएसआरडीसीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले गेले आहे. खरेतर, प्रकल्पाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

    यासाठी सोविल कन्स्लटन्सी फर्म या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आता या कंपनीकडून लवकरच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संबंधितांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे.

    दरम्यान या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाल्यानंतर याला राज्य शासनाकडून मंजुरी घेतली जाईल आणि प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू होऊ शकणार आहे. या नव्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास फारच वेगवान होईल अशी आशा आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here