
Maharashtra School : राज्यातील शालेयविद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अधिक महत्त्वाचा जीआर जारी केला आहे. या अंतर्गत आता पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचव्या ऐवजी इयत्ता चौथीसाठी तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी ऐवजी सातवीच्या वर्गासाठी घेतली जाणार आहे.
ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी लागू करण्यात आली मात्र या निर्णयाचा थोडासा नकारात्मक प्रभाव पाहायला मिळाला. 2016 17 पासून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र हा निर्णय झाला आणि तेव्हापासून या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आणि म्हणूनच हा निर्णय फिरवला गेला पाहिजे अशी मागणी उपस्थित झाली. पूर्वीप्रमाणेच स्कॉलरशिप परीक्षा चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेतली पाहिजे अशी मागणी विविध शैक्षणिक संघटनांकडून शिक्षकांकडून तसेच पालकांकडूनही उपस्थित होउ लागली.या अनुषंगाने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेतली जाईल असे संकेत मिळाले होते. स्वतः शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा अशीच ग्वाही दिली होती.दरम्यान यानुसार राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून आज अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षी
आणि सातवी सोबतच पाचवी आणि आठवी या वर्गासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु ही फक्त एक वेळची बाब राहणार आहे.





