महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा-जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोंडे

491

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा-जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोंडे*

बीड : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकनायक वंदनीय बच्चु भाऊ यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ,उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रमुख नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाची सभासद नोंदणी जोरात सुरू असून बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सभासद नोंदणीला मदत जोरदार मिळत आहे.
अनेक पदाधिकारी कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रत्येक वयोगटातील त्यात महिला,पुरुष,तरुण,व्यापारी,कामगार,शेतकरी,शेतमजूर,समाजातील वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींपर्यंत पोहोचून सभासद नोंदणी करत असून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे यांनी सभासद नोंदणी बीड जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीने करण्याचे आव्हान केले आहे.आणि ते आव्हान बीड जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील काही दिवसात मोठ्या ताकतीने पार करतील यात कोणतीही शंका नाही.
त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही आव्हान करत आहोत की तुम्ही प्रहार चे सभासद आनंदाने व्हा आणि एक वेगळा महाराष्ट्र बच्चू भाऊंच्या साथीने आपण घडवण्याचे स्वप्न पाहत आहोत ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा.असे आव्हान बीड जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोंडे यांनी केले आहे. बीड- नवनाथ आडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here