महापालिकेच्या कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारीपदी शशिकांत नजान यांची नियुक्ती
अहमदनगर- महापालिकेच्या कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी म्हणून प्रभारी उपउद्यान अधिकारी शशिकांत नजान यांची महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नियुक्ती केली आहे, उपायुक्त श्री. यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नजान कोरोना दक्षता पथकाचे व इतर विभागाचे कामकाज पाहणार आहेत.
शशिकांत नजान यांनी यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा ती यांचे प्रसिद्धी प्रमुख तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांचे प्रसिद्धी प्रमुख या सह प्रसिद्धी विभाग, आरोग्य व विभाग, विशेष घटक विकास योजना, महापौर कार्यालय, प्रभारी उद्यान विभाग प्रमुख म्हणून काम केले असून गेली जवळ जवळ दोन वर्षे कोरोना दक्षता पथक प्रमुख म्हणून कामकाज पाहात आहेत. या माध्यमातून गर्दी नियंत्रण, विनामास्क दंडात्मक कारवाई, कोरोना नियम व बंधन न पाळणाऱ्या दुकानांवर कारवाई असे प्रभावी काम करीत असताना, लॉकडाऊन काळात अन्नवाटप, किराणा किट वाटप, कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे त्यांना धीर देणे, लसीकरण बाबत मार्गदर्शन करणे असे कार्य महापालिकेच्या माध्यमातून केले आहे. तसेच गेली २५ वर्षा पेक्षा जास्त काळ ते नगरच्या नाट्य-चित्रपट – सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक म्हणूनही त्याची ओळख आहे.