महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नत्ती
महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नत्ती मिळाली आहे. नगर महापालिकेतील रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावरच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत.
सुमारे तीन वर्षांपूर्वी डॉ. पठारे यांची मालेगाव महापालिकेतून नगर महापालिकेत उपायुक्त पदावर नियुक्ती झाली होती. राज्यभरात गाजलेल्या पथदिवे घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेत बदली झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय कामकाजात शिस्त आणण्यासाठी कठोर पावले उचलली. महापालिकेतील अनेक नाठाळ व कामचुकार कर्मचारी, विभागप्रमुखांवर त्यांनी कारवाई केली.
आता नगरविकास विभागाने त्यांनी अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नत्ती केली असून, नगर महापालिकेतील रिक्त पदावरच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.