- मात्र याचवेळी सभापती अविनाश घुले यांनी समितीच्या सदस्यत्त्वपदाचा राजीनामा दिला
- राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या नऊ जागांवर सदस्यांची नियुक्ती
- करण्यात आली. नियुक्त सदस्यांमध्ये राष्ट्रवादी चार, भाजप व शिवसेना
- प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.
- महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होत असतात. पहिल्या वर्षी चिठ्ठ्या टाकून आठ सदस्यांची नावे काढली जातात. त्यानंतर मात्र ज्या सदस्यांना दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, ती सदस्य आपोआप मुदत संपल्यानंतर निवृत्त होतात. या रिक्त जागांवर पक्षीय बलानुसार नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. पक्षाचे गटनेते आपल्या सदस्यांची नावे महासभेत पिठासीन अधिकारी तथा महापौर यांच्याकडे बंद पाकीटात देतात आणि सभेत हे पाकीट उघडून त्यातील नावे वाचन दाखविली जातात. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सभेत महापौर रोहिणी शेंडगे यांनी चारही पक्षाच्या गटनेत्यांनी दाखल केलेल्या नावांचे वाचन करून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
- समितीचे सभापती अविनाश घुले यांनी प्रकृतीचे कारण सांगून समिती सभापती आणि सदस्यत्त्वाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे रिक्त झालेल्या या नवव्या जागेवरही लगेच नियुक्ती करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांमध्ये गणेश कवडे व मंगल लोखंडे (शिवसेना), कुमारसिंह वाकळे, विनित पाऊलबुधे, ज्योती गाडे, मीना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), रुपाली निखिल वारे (काँग्रेस), राहुल कांबळे व गौरी ननावरे (भाजप) या सदस्यांचा समावेश आहे.
Home महाराष्ट्र महापालिका स्थायी समितीच्या रिक्त आठ जागांवर निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभा झाली सभापती...