
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीने मांडली आहे. आज खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले.
२०१८ मध्ये पारदर्शक, कायदेशीर व तांत्रिकदृष्ट्या सुसंगत पद्धतीने झालेली प्रभाग रचना कायम ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्या रचनेत लोकसंख्या, भौगोलिक सलगता आणि सामाजिक समतोल या निकषांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.
नागरिकांची स्पष्ट मागणीः
➡️ कोणताही राजकीय हस्तक्षेप नको
➡️ पारदर्शक आणि निःपक्षपाती रचना हवी
➡️ कायद्याच्या चौकटीतच फेरबदल व्हावेत.
➡️ शासन व निवडणूक आयोगाच्यामार्गदर्शक तत्वांचे पालन व्हावे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रभाग रचना ही न्याय्य, पारदर्शक आणि पक्षपाती राजकारणापासून दूरच असली पाहिजे !
..
..
..
#MahavikasAghadi #NileshLanke#AbhishekKalamkar#Altamashjariwala#Municipal Election




