- महापालिकेतील नगररचना विभागातील अभियंता कल्याण बल्लाळ (वय- ५४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. बल्लाळ गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत कार्यरत होते. काही वर्षांचा अपवाद वगळता त्यांची पूर्ण सेवा नगररचना विभागात झाली. नगर शहर विकास आराखडा, शहरातील नियोजन, ले आऊट, त्या संदर्भातील नियम यांची खडानखडा माहिती असणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. बल्लाळ यांच्या निधनाने महापालिका वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
- अहमदनगर महानगरपालिकेचे नगर रचना विभागातील उप अभियंता कल्याण बल्लाळ यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
- कल्याण बल्लाळ यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती साठी अर्ज दाखल केला होता अनेक वर्ष त्यांनी नगर रचना विभागात काम केल्यामुळे त्यांना नगर शहराचीचांगली माहिती असल्याने आणि अभ्यास असल्याने महानगरपालिकेत कोणाचीही सत्ता आली तरी कल्याण बल्लाळ यांना घेऊनच शहराच्या विकासाबाबत कामकाजावर चर्चा होत असे.
- सोमवारी त्यांचे सकाळच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन दुःख निधन झाल्याची बातमी समजतात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये दुखाचे सावट पसरले होते.





