महानगर पालिका काही करत नाही, जज साहेब !रात्री भटके श्वान झोपू देत नाही:याचिका दाखल.

रात्री भटके श्वान झोप मोड करत असल्याचे सांगत नगर जिल्ह्यातील नागरिकांनी चक्क औरंगाबाद खंडपीठात धाक घेतली आहे. याबाबत लकरच सुनावणी पार पडणार आहे.

औरंगाबाद – जज साहेब !रात्री भटके श्वान झोपू देत नाही, महानगर पालिका काही करत नाही, असे म्हणत नगर जिल्ह्यातील नागरिकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे. याबाबत लवकरच सुनावणी सुरू होईल, अशी माहिती अ‍ॅड. सत्यजित कराळे पाटील यांनी दिली आहे.’

ही’ आहे तक्रारनगर शहरातील स्टेशनवरील हेरिटेज कॉलनीतील नागरिक सध्या मोकाट श्वानांमुळे त्रस्त झाले आहेत. भटकी श्वान रात्रीच्या वेळी कॉलनीत येऊन नासधूस करतात. दुचाकी गाड्यांचे सीट फाडतात.

चारचाकी गाडीवर चढून नखांमुळे गाडीवर स्क्रॅच वाढतात, उंदीर किंवा घुस तोंडातून पकडून परिसरात टाकतात, सर्वत्र घाण करतात, रात्री भांडल्याने खूप आवाज होतो.

त्यामुळे रात्राची झोप खराब होत आहे. रात्रीची झोप हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळत नाही, अस तक्रारीत म्हटले आहे….म्हणून न्यायालयात घेतली धाव

हेरिटेज कॉलनी परिसरातील नागरिकांनी याबाबत महानगर पालिकेत तक्रार केली. मात्र भडकी श्वानांबाबत त्यांची नसबंदी वगळता काही करू शकत नाही.

त्याबाबत काही अन्य उपाय करणे शक्य नाही आणि केले ते कायदेशीर होणार नाहीत, अस उत्तर मिळाली. त्यामुळे न्यायालयात यावे लागले, असल्याचे अ‍ॅड. सत्यजित कराळे पाटील यांनी सांगितले आहे.

काही बाहेरील देशांमध्ये अशा भटक्या श्वानांसाठी विशेष व्यवस्था म्हणजेच जागा केलेली असते. तशी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी असल्याचे अ‍ॅड. सत्यजित कराळे पाटील यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here