दी.8/10/2020 रोजी अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाच्या देहरे येथे नवीन व जुनी दोन्ही मुख्य जलवाहिनीला नव्याने टाकण्यात आलेली एम एस 1100 एम एम व डीआय 700 एम एम जोडण्याच्या कामासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे मार्फत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठी च्या टाक्या भरता येणार नाही.
दरम्यानच्या काळात दोन्ही मुख्य जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने गुरुवार दिनांक 8/10/20 रोजी बोलेगाव नागपूर सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसर, लक्ष्मी नगर, सूर्य नगर, निर्मल नगर व तसेच स्टेशन रोड परिसर, सारसनगर, मुकुंद नगर, केडगाव, नगर कल्याण रोड वरील शिवाजीनगर परिसर सकाळी 10 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
परिणामी शुक्रवार दिनांक 9/10/20 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या भागास म्हणजेच मंगल के झेंडीगेट, डाळ मंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हाडको व दुपारनंतर बुरुडगाव रोड परिसरात महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागात पाणीपुरवठा हा शुक्रवार ऐवजी शनिवार दिनांक 10/10/20 रोजी करण्यात येईल.
तसेच शनिवार दिनांक 10/10/20 रोजी पाणीपुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, आगरकर मळा, सारस नगर परिसर भागात पाणीपुरवठा होणार नसून तो रविवार दिनांक 11/10/20 रोजी करण्यात येईल तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिके सहकार्य करावे.
आपलाच:-
Home महाराष्ट्र अहमदनगर महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा अनियमित :पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिके सहकार्य करावे.