अहमदनगर –
अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांच्या वतीने कोरोना नियमावली अंतर्गत शहरातील पेशवाई श्रीमंत या रेडिमेड कापड दुकानातील ८० कर्मचाऱ्यांची कोरोना RTPCR चाचणी करण्यात आली.

या दुकानाचे व्यवस्थापक श्री.प्रशांत बल्लाळ यांनी स्वतःहून पत्र देत कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची तयारी दर्शविली याच प्रमाणे शहर आणि उपनगरातील व्यावसायिक,दुकानदार आणि खाजगी आस्थापना यांनी पुढाकार घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यास कोरोना प्रादुर्भाव होण्यास आळा बसेल असे कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी सांगितले
नागरिकांनी पुढाकार घेऊन कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्त श्री.शंकर गोरे,आरोग्य अधिकारी डॉ.श्री.सतीश राजूरकर आणि सर्व पदाधिकारी अधिकारी यांनी केले आहे.

यावेळी पेशवाई श्रीमंतचे व्यवस्थापक श्री.प्रशांत बल्लाळ , दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान
सहाय्यक,श्री.नंदकुमार नेमाणे, श्री.सूर्यभान देवघडे,श्री.राहुल साबळेश्री.भास्कर आकुबत्तीन,श्री.अनिल आढाव,अमोल लहारे,श्री.राजेश आनंद,श्री.राजू जाधव,श्री.रिजवान शेख ,विष्णू देशमुख,राजेंद्र बोरुडे,कांगुर्डे सर,गणेश वरुटे,नंदू रोहोकले, पेशवाई श्रीमंतचे राहुल येमुल,अमोल येमुल उपस्थित होते.