महात्मा फुलेंचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते -सुशांत म्हस्के
आरपीआयच्या वतीने महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्येचे सर्वश्रेष्ठ महत्त्व पटवून देणारे स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पनांना साकाररूप देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला प्रकाशित केले. मुलींच्या शिक्षणाची सोय करून आजच्या स्त्रीला त्यांनी आदर स्थान मिळवून दिले आहे. फुले दांपत्यांनी दीनदलितांच्या उद्धारासाठी कार्य केले. सामाजिक रूढी, परंपरा व अंधश्रध्दा झुगारून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजात बदल घडवण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी अखंड मानव जातीच्या उद्धारासाठी कार्य केले असल्याची भावना आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष म्हस्के बोलत होते. याप्रसंगी आरपीआयचे कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, ऋषी विधाते, दिनेश पाडळे, सनी भिंगारदिवे, जमीर इनामदार आदि उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुलेंचा जयघोष करुन त्यांना अभिवादन केले.
- health
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- खेळ
- देश-विदेश
- नवी मुंबई
- नागपूर
- नाशिक
- पुणे
- बीड
- मुंबई
- राजकारण
- रायगड
- रोजगार