वर्धा दि. 24 (जिमाका)राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्प्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण , पीक प्रात्याक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबीसाठी इच्छुक शेतक-यांनी 10 सप्टेंबर पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करुन नोंदणी करावी , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्याक्षिकासाठी अर्ज करतांना सबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन 10 हेक्टर क्षेत्र असणा-या गटांनी नोंदणी करावी.
हरभरा प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतील वाणास 25 रुपये प्रति किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रुपये प्रति किलो व रब्बी ज्वारी 10 वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रति किलो व 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रति किलो असे एकुण किमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.
हरभरा, करडई व रब्बी ज्वारी पीक प्रात्याक्षिकासाठी एका शेतक-याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे , जैविक खते, सुक्ष्ममुलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधी या निविष्ठासाइी शेतक-याला 1 एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबधित पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार ते 4 हजार प्रति एकर मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येणार असुन पॅकेजचा वापर अनिवार्य राहील. शेतक-यांनी निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
0000
Home English News Insurance महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनेच्या घटकासाठी शेतक-यांकडून अर्ज घेण्याला सुरवात





