महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) विविध प्रश्नांसंदर्भात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत बैठक घेतली.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा व सहकारी उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने
॰ अहमदनगर MIDC येथे ट्रक टर्मिनल करिता भूखंड मंजुरी
॰ ग्रामपंचायत कराची वसुली ग्रामपंचायत ऐवजी MIDC कडून करणे
॰ अहमदनगर येथे MIDC चे प्रादेशिक कार्यालय पूर्ववत सुरू करणे
॰ अहमदनगर आणि सुपे MIDC विस्तारीकरण कामाला गती देणे
आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.






