महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेमार्फत #चंदनापूरी, #धांदरफळ, #जवळेकडलग, #घारगांव, #जवळे_बाळेश्वर या प्राथमिक आरोग्य केंद्राना रूग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या.
सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ.डाॅ.सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे व कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात यांच्या हस्ते ‘यशोधन जनसंपर्क कार्यालयात’ करण्यात आले. तसेच या रुग्णवाहिकेवरील चालकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, मार्केट कमिटीचे सभापती शंकर पाटील खेमनर, उपसभापती नवनाथ अरगडे, जि.प.काँग्रेस गटनेते अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, महेंद्रशेठ गोडगे, मिलिंद कानवडे, सिताराम राऊत, पंचायत समिती सदस्य सौ.निशाताई कोकणे, विष्णुपंत राहटंळ, सौ. बेबीताई थोरात, सौ. अर्चनाताई बालोडे, उपविभागीय अधिकारी शंशिकात मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप, सुभाष सांगळे, सुरेश झावरे, निखील पापडेजा, अॅड.सुहास आहेर, गौरव डोंगरे व आदि मान्यवर उपस्थित होते.





