महत्वाच्या विविध घडामोडी

658

*अहमदनगर जिल्ह्यात आज पहिली सहकार परिषद:* देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज शनिवारी प्रवरानगर, लोणी येथे देशातील पहिली सहकार परिषद, शेतकरी मेळाव्याचे आयोजन *समाजवादी पार्टीच्या तीन मोठ्या नेत्यांच्या घरावर छापे:* उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच समाजवादी पार्टीच्या 3 मोठ्या नेत्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी, मऊमध्ये समाजवादी पार्टीचे सचिव राजीव रॉय, लखनऊतून जैनेंद्र यादव आणि मैनपुरीत मनोज यादव यांच्यावर घरावर आयकर विभागाचे आज छापे *उबेर आणि व्हॉट्सअ‍ॅपची भागीदारीची घोषणा!* उबेरनेव्हॉट्सअ‍ॅपशी केलेल्या करारानुसार, ग्राहक आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उबेर कॅब बुक करू शकणार, उबेर प्रायोगिक तत्त्वावर लखनऊमध्ये अंमलबजावणी करणार, गाडी बुक करण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळणार *मुंबईत मोकळ्या जागांवर होणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध!* आयुक्त इकबालसिंह चहल राज्य शासनाच्या आदेशानुसार, मुंबईत मोकळ्या जागी जसे रेसकोर्स, मोठी मैदाने येथे होणाऱ्या जंगी कार्यक्रमांना केवळ 200 लोकांनाच परवानगी, बॅन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या 50%  मर्यादेपर्यंत प्रवेश असणार आहे. मोकळ्या जागांवर क्षमतेच्या  25% लोकांनाच परवानगी असणार *छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना!* कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवारी विटंबना, बंगळुरुतल्या गुंडांचा तीव्र निषेध; महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया *हिंगोली पुन्हा हादरली!* पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना धक्का; भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली, सकाळी 08:56 वाजता जमिनीतून आला गूढ आवाज, वसमत कळमनुरी औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांना बसले हादरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here