महत्वाच्या बातम्या वाचा दोन मिनिटात..

414
  • ?? मराठी माध्यमांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा :
  • शालेय शिक्षणमंत्री यांनी मराठी माध्यमांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. पालकांच्या इंग्रजी शिकण्याच्या हट्टापायी मराठी शाळा ओस पडत असताना वर्षा गायकवाड यांनी आता मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाईल असं सांगितलं आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकं तयार असतील अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
  • ??_ *व्यापाऱ्यांना दिलासा! राज्य सरकारची अभय योजना* :_
  • कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला राज्य सरकारने दिलासा दिला आहे. विक्रीकराची 10 हजार रुपयांपर्यंतची सर्व थकबाकी माफ, तर 10 लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांनी 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ करण्याची तरतूद असलेले विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. या अभय योजनेचा सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक व्यापारी, उद्योजकांना फायदा होईल, असा दावा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
  • ??_*राणेंनंतर मोहित कंबोज यांना मुंबई महापालिकेची नोटीस* :_
  • आता भाजपच्या मोहित कंबोज यांना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. स्वत: मनोज कंबोज यांनी याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मोहित कंबोज यांनादेखील पालिकेने अनधिकृत बांधकामाबाबतच नोटीस पाठवली आहे. त्यानुसार लवकरच मुंबई महापालिकेचे पथक मोहित कंबोज यांच्या घराची पाहणी करणार आहे. दरम्यान, पालिकेच्या नोटीशीनंतर मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
  • _??*’गली बॉय’ रॅपरचं 24 व्या वर्षी निधन* :_
  • ‘गली बॉय’च्या एका रॅपरचं निधन झालं आहे. एमसी या नावानं लोकप्रिय झालेल्या या रॅपरनं वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता रणबीर सिंगनं त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीनं सोशल मीडियावरुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या रॅपरच्या निधनानं चाहत्यांनी धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here