महत्वाच्या बातम्या वाचा

692

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर ‘शाई हल्ला’!* एका महामेळाव्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून केला हल्ला; महाराष्ट्र एकीकरण समितीने नोंदवला निषेध, मराठी भाषकांच्या वतीने उद्या मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन *देशात ओमिक्रॉनचे एकूण 38 रुग्ण!* या 38 रुग्णांपैकी उपचारांनंतर 20 बरे होऊन घरी परतले, उर्वरित 18 रुग्णांपैकी कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत, ओमिक्रॉन संसर्गित रुग्ण आढळणाऱ्या राज्यांची संख्या आता 8 वर *म्हाडा पेपरफुटी प्रकरण वातावरण तापलं:* म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने, पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात; रविवारी अचानक परीक्षा झाली होती रद्द *सेन्सेक्सची आज दमदार सुरुवात!* बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला सेन्सेक्सने 59 हजारांना आकडा ओलांडला; निफ्टीने 17,580 च्या आसपास ट्रे़ड करत जवळपास 100 अंकांने घेतली होती उसळण *सोने व चांदीचे आजचे दर:*▪️ गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,770रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,770 प्रति 10 ग्रॅम आहे. ▪️ पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,270 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,570 रुपये असेल. ▪️ नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,770 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,770 रुपये इतका असेल.▪️ चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 612 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here