महत्वाची बातमी ! मुंबईत आणखी एक सी-लिंक; वेळेची होणार मोठी बचत

    108

    मुंबई म्हंटल की आपल्यासमोर चित्र उभा राहत ते म्हणजे वाहतूक कोंडी. मुंबईमध्ये जे नागरिक राहतात, दररोज कामाला जातात अशा नागरिकांसाठी मुंबईची वाहतूक कोंडी म्हणजे डोकेदुखी आहे. मात्र याच वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी आता आणखी एक महत्वाकांक्षी सागरी महामार्ग प्रत्यक्षात साकारत आहे. उत्तन ते विरार सी-लिंक (Uttar Virar Sea Link – UVSL).

    मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA क या प्रकल्पाचा पहिला टप्पा हाती घेण्यात आला असून, याला अधिकृत मंजुरी देखील मिळाली अताज्या बातम्याहा नवा महामार्ग 8-लेन असणार आहे. या सागर. मार्गामुळे उत्तनपासून विरारपर्यंतचा प्रवास केवळ ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. सध्या हा प्रवास सुमारे दोन तासांचा असून, त्यामुळे नागरिकांचा वेळ मोठ्या प्रमाणात जात असून मानसिक ताण देखील नागरिकांना येतो.

    कसा असेल हा प्रकल्प?

    प्रकल्पाचा पहिला टप्पा एकूण 55.12 किमी लांबीचा असणार आहे. यामध्ये उत्तन ते विरार सागरी सेतू – 24.35 किमी, उत्तन जोडरस्ता -9.32 किमी, वसई जोडरस्ता – 2.5 किमी आणि विरार जोडरस्ता – 18.95 किमीचा असणार आहे. या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Express Highway), लिंक रोड आणि SV रोडवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. मुंबईच्या उत्तर भागाला स्वतंत्र आणि जलद प्रवेशमार्ग मिळणार आहे.

    हा महामार्ग भविष्यात थेट दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी (Delhi-Mumbai Expressway) जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईच्या उत्तर भागाला देशाच्या प्रमुख वाहतूक मार्गांशी थेट संपर्क मिळेल. परिणामी, या भागात उद्योगधंदे, पर्यटन आणि व्यापार वाढण्यास मोठी मदत होईल. उत्तन आणि विरार परिसर समुद्रकिनाऱ्यालगत असून, येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. महामार्गामुळे या परिसरांचा विकास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    28 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत पहिल्य टप्प्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे. या सागरी महामार्गामुळे फक्त प्रवाशांनाच नव्हे तर स्थानिक रहिवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईच्या उपनगरांमधून रोज कामासाठी येणाऱ्या हजारो नागरिकांना याचा लाभ होईल. विरार, वसई, उत्तन परिसरातील नागरिकांसाठी ही जलद वाहतूक व्यवस्था ठरणार आहे. याशिवाय, या भागांमध्ये मालवाहतूक करणे देखील अधिक सोपे होईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here